योग अभ्यासाने शारीरिक आणि मानसिक पातळीवर उत्तमरीत्या समतोल राधल्यास निरोगी व्यक्तिमत्त्व लाभते, हे आता पटू लागल्याने योगाभ्यासाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. योगविद्या परदेशात लोकप्रिय होत असल्याने भारतीयांनाही आता त्याचे महत्त्व पटू लागले आहे.
विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच योगाभ्यास उपयुक्त ठरत असल्याने, परीक्षा, घरगुती समस्या, आणीबाणीच्या प्रसंगी योग करणारी व्यक्ती एकदम टोकाची भूमिका न घेता समन्वयाची भूमिका घेते. शरीरातील सर्व यंत्रणा सुरळीत होत असल्याने तसेच प्रत्येक अवयवाला व्यायाम लाभल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढून दिवसभर उत्साह टिकून राहतो.
आजकाल कामाच्या गरजेनुसार सतत बसल्याने अंगदुखी, पाठदुखीसारखे विकार उद्भवतात. शरीराची हालचाल कमी होते. अशा वेळी योगासने केल्यास शरीर तंदुरुस्तीबरोबर मन:शांती लाभते. समाधानी वृत्ती वाढते.
सूर्यनमस्कारामुळे तर सांध्याचे विकार जवळदेखील फिरकत नाहीत. योगासनाला परस्परपूरक असलेल्या प्राणवायूमुळे आजूबाजूच्या हवेत, वातावरणात कितीही बदल झाला तरीही सर्दी, पडसे, खोकला यांसारखे आजार होत नाहीत. प्रतिकारशक्ती वाढते. मानवी शरीरातील चक्रे आणि ग्रंथी या निद्रित अवस्थेत असतात. योगासनांमुळे त्या जागृत होता. कामाच्या व्यापात शरीर कमालीचे बेशिस्त बनते. योगामुळे सर्व क्रिया या वेळेत पार पडत असल्याने आपोआपच जीवनात शिस्तबद्धता येते.
शरीराला प्रामुख्याने सात्त्विक आहाराची गरज असते. पण तसे न होता- विशेषत: तरुण मुलांकडून काहीही खाण्याचे प्रमाण वाढत आहे. खाण्याच्या अनियमित वेळा आणि व्यसनांमुळे शरीराचा समतोलच बिघडून जातो. अशा वेळी नियमित योगासने केल्याने भोग आणि योग एकत्र राहूच शकत नाहीत. या उक्तीप्रमाणे व्यसनमुक्ती मिळू शकते आणि पचनक्रियाही योग्य रीतीने कार्यान्वित होते. अनेकांना वेगवेगळ्या कारणांनी लठ्ठपणाने ग्रासलेले दिसते. अशा वेळी योगाभ्यासाने शरीरातील सर्व अवयवांना पुरेसा व्यायाम मिळाल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
"सहजता, समज आणि सातत्य' या त्रिसूत्रीनुसार योगाचे कार्य चालते. धावपळीच्या जीवनात माणसाची उडणारी त्रेधातिरपिट पाहता, तंदुरुस्त मन आणि
शरीरासाठी योगाभ्यासाची नितांत गरज वाटते.

No comments:
Post a Comment