‘लिहावे नेटके’चा पुस्तकसंच वाचताना तो विद्यार्थी दशेतल्या मुलांबरोबरच ज्यांनी मराठीची हेळसांड केली आहे, अशा लोकांनाही द्यावा, असं पट्कन मनात येतं.
माधुरी पुरंदरेंनी मराठी भाषा नीट लिहिता-वाचता यावी म्हणून अतिशय परिश्रमपूर्वक दोन खंड तयार केले आहेत.
प्रथम एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. खंड वगैरे म्हटलं की वाचक आधीच भांबावतो. ही मराठी भाषा शिकवणारी पुस्तकं असली तरी व्याकरण शिकवणाऱ्या जड पुस्तकासारखी नाहीत. चित्रं, फोटो, चौकटी, चिन्हांकित सूचना, अतिशय सोपे गाळलेल्या जागा भरण्याचे स्वाध्याय आणि नेटकी दर्जेदार निर्मिती हे या पुस्तकांचं वैशिष्टय़. पूर्वी ‘हाऊस ऑफ सोविएत कल्चर’च्या वतीने मूळ रशियन पण मराठीत अनुवादित केलेली अशी चित्रमय दर्जेदार पुस्तकं असायची. ‘लिहावे नेटके’चा संच पाहून त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
हा संच ज्योत्स्ना प्रकाशन, वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र, पुणे आणि सर रतन टाटा ट्रस्ट इनिशिएटिव्हच्या ‘पराग’ या

मराठी शिकणाऱ्यांसाठी, मराठी शिकवणाऱ्यांसाठी आणि मराठीचा वापर करणाऱ्या सर्वासाठी हा पुस्तकसंच उपयुक्त आहे. भाग १, भाग २ आणि उत्तरांची पुस्तिका असा हा संच आहे. या पुस्तकांच्या पाठी पुस्तकांच्या निर्मितीच सार लिहिलेलं आहे. ते असं..
‘‘भाषा हा केवळ कथा-कादंबऱ्या-कविता लिहिणाऱ्यांसाठी राखून ठेवलेला प्रांत नव्हे. प्रत्येकालाच आपापल्या क्षेत्रात, आपापल्या व्यवसायात भाषेचा वापर नेटकेपणे करता यावा लागतो, योग्य प्रकारे आणि आत्मविश्वासाने बोलता आणि लिहिताही यावे लागते. भाषा मुळातच कच्ची राहिली, तर कोणताही विषय नीट समजणे कठीण होऊन बसते; इतर भाषा शिकतानाही खूप अडचणी येतात.
म्हणून लेखन सुधारण्यासाठी मुलांना उपयोग व्हावा आणि त्यांना मदत करणे मोठय़ांना सोपे व्हावे, अशा उद्देशाने ‘लिहावे नेटके’ हा पुस्तकांचा संच तयार केला आहे.
मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या पाचव्या-सहाव्या इयत्तेपासून पुढच्या मुलांना ह्या पुस्तकांचा उपयोग होईलच, शिवाय इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनाही आपली मराठी भाषा सुधारण्यासाठी ह्या पुस्तकांचा चांगला उपयोग होऊ शकेल. ’’

पुस्तकसंचाच्या लेखिका आणि सादरकर्त्यां माधुरी पुरंदरे वाचकाला उद्देशून सांगतात, ‘‘स्वत:चे अनुभव लक्षात घेऊन बरीच खटपट करून मी हे पुस्तक तुझ्यासाठी तयार केले आहे. तुलाही नेहमी भाषेचा वापर करावा लागतो. शाळेतच नव्हे, तर एरव्हीही लिहावे-बोलावे लागते. ते करताना तुझ्याकडून कमीत कमी चुका व्हाव्यात, तुझा आत्मविश्वास वाढावा ह्यासाठी

भाषा हा केवळ कथा-कादंबऱ्या-कविता लिहिणाऱ्यांसाठी राखून ठेवलेला प्रांत नव्हे. प्रत्येकालाच आपापल्या क्षेत्रात, आपापल्या व्यवसायात भाषेचा वापर नेटकेपणे करता यावा लागतो, योग्य प्रकारे आणि आत्मविश्वासाने बोलता आणि लिहिताही यावे लागते.
हे सगळे व्यायाम ‘प्रमाण मराठी’ भाषेसाठी तयार केलेले आहेत. सर्वाना कळेल अशी मराठी आपल्याला वापरावी लागते. तिला ‘प्रमाण मराठी’ असे नाव आहे. तू शाळेत शिकत असलेली, वर्तमानपत्रातील किंवा पुस्तके-मासिकांमधील, रेडिओ-चित्रवाणीचे निवेदक बोलतात ती मराठी ‘प्रमाण’ असते.अक्षरांशी आणि शब्दांशी खेळताना खूप मजा आली पाहिजे. मला येते. तुलाही ती यावी म्हणून हा सगळा खटाटोप केला आहे.’’
हसत-खेळत मराठी शिकवणाऱ्या अशा पुस्तकाची कमतरता होती. ती ‘लिहावे नेटके’ या अभिनव पुस्तकसंचाने भरून काढली आहे. म्हणून अशा उपक्रमांचे स्वागत करायला हवे.
लिहावे नेटके : लेखक - माधुरी पुरंदरे
प्रकाशक : ज्योत्सना प्रकाशन,
वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र, पुणे
किंमत : भाग-१, भाग-२, उत्तरपुस्तिका
एकत्रित रु. ४००
No comments:
Post a Comment