शाळा.........
.....त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत,
पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण
त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्या पांढर्या
पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक
वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा
नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.........
1 comment:
शाळेच्या सुंदरआठवणी आणि सुंदर लेख!!
Post a Comment