Total Pageviews

Tuesday, September 29, 2015

मुंडे, मोदी, लातूरची सभा आणि पाऊस..एक आठवण .....



स्थळ – क्रीडा-संकुल, लातूर
कार्यक्रम – देशाचे भावी पंतप्रधान आणि आमचे प्राणप्रिय मित्र नमोजी अर्थात नरेंद्र मोदी
प्रमुख व्यक्तिरेखा – नमोजी, गोमूजी अर्थात गोपीनाथ मुंडेजी आणि इतर सहकालाकर  

९ एप्रिल चा दिवस माफ करा संध्याकाळ लातूरच्या इतिहासात कायमची लक्षात ठेवावी अशी झाली आहे. भाजपा चे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि आमचे प्रियमित्र अर्थात नरेंभाय अर्थात नमोजी यांची सभा लातूरात होणार होती आणि योगायोगाने आम्ही तिथे पोहोचलो. दुपारी ३.३० वाजता सभा होणार म्हणून रखरखत्या उन्हात लोकांनी भली मोठी रांग लातूरच्या क्रीडा-संकुल मैदानाबाहेर लावली होती. तयारी तर जोरदार होती पण नमोजींना येण्यास उशीर होणार होता. मैदान अगदी गच्च भरल होत... अर्थात माणसांनी... आम्हीही एका कोपर्‍यात उभे राहिलो जिथे मोठा स्पीकर लावला होता.
      वाट बघून बघून लोक कंटाळली होती आणि कर्मधर्मसंयोगाने आला... कोण म्हणजे काय साक्षात वरुण राजा पवनदेव आणि विजमातेला घेऊन आला. मग काय सगळीकडे धकधक वाढू लागली आणि भाजपा नेते सर्वांना थोपवून धरू लागले... नमोजी आल्यावर घोषणा कशा द्यायच्या याच मार्गदर्शन केल आणि लगेच त्याची उजळणी करून घेतली.... कौन आया कौन आया अशी हाक स्टेज वरुण येताच हिंदुस्तान का शेर आया अशी ती घोषणा होती.
      जशा जशा पावसाचा कहर वाढत गेला तसा तसा लोकांचा लोंढा जाऊ लागला. काही उत्साही मंडळींनी ज्या चटया बसायला आंथरल्या होत्या त्या लातूरी गुनाप्रमाणे डोक्यावर घेण्यास सुरू केल आणि मेंढ्यांच्या गोष्टीप्रमाणे ही ‘style’ संपूर्ण मैदानात आचरणात येऊ लागली. स्टेज वरील नेत्यांना मग चिंता वाटू लागली की काही क्षणापर्यंत नजर जाईल तिकडे सगळीकडे माणसांची डोकी दिसत होती आणि आता नुसत्या हिरव्या चटया दिसू लागल्या, नमोजी आल्यावर काय दाखवणार असा प्रश्न पडू लागला;नमोजी गोंधळून जातील की आता आपण देशभर जसा देस तसा भेस करतो त्याप्रमाणे येथे डोक्यावर चटया घ्याव्या लागतील की काय. बर आयोजकांना अवघडल्यासारख झालं, लोकांना चटया डोक्यावर घेऊ नका सांगावं तर लोक माइडांनातील निघून जातील. आम्ही मात्र स्पीकर लावला होता त्या आडोशाला उभे राहिलो होतो पण काही क्षणाने आमच्या लक्षात आल की पवनराजाच्या मर्जिणे तो स्पीकर डगमगू लागला होता, निवडणूक ते लढवणार, पंतप्रधान ते होणार पण स्पीकर अंगावर घेऊन आम्ही शहीद होऊन निकाली लागायचो म्हणून आम्हीही चटकन बाजूला मग चटई चाच आधार घेतला.
      अशी भयानक परिस्थिति असताना अचानक आमचे अजून एक प्रियमित्र गोमुजी अर्थात गोपीनाथ मुंडेजी मान फिरवत अगदीsuperhero सारखे आले आणि जाणार्‍या लोकांचा लोंढा परत मैदानात जमा होऊ लागला. गोमुजी भाषण करू लागले आणि एका कार्यकर्त्याने गोमुजींच्या डोक्यावर छत्री धरण्याचा प्रयत्न केला. जनता चटया डोक्यावर घेते आणि नेता छत्री; बर झालं नमोजी अजून आले नव्हते नाहीतर ही सभा लातूरच्या सोडाच पण नमोजींच्या लक्षात आयुष्यभर राहिली असती. पण आमचे प्रियमित्र गोमुजी अतीचलाख आहेत हे उभा महाराष्ट्र आडवा होऊन पहात आलाच आहे, आणि गोमुजी यांनी ती छत्री घेतली आणि माझी जनता जर भिजत असेल तर मीही भिजेण अस म्हणून ती छत्री बंद करून ठेऊन दिली आणि मैदानात एकाच जल्लोष सुरू झाला. मग हळूहळू सर्वांनी झेंडे उतरवायला अर्थात डोक्यावरील चटया काढून सुरुवात केली आणि मुंडे साहेब एकदम हीरो झाले... माफ करा... हीरो चेsuperhero झाले.
      नंतर मग नमोजी आले. त्यांच्या आणि आयोजकांच्या आणि जनतेच्याही सुदैवाने सारी परिस्थिति नियंत्रणात आली होती. मगभाईयो-बहनो म्हणत नेहमीचच भाषण झालं. पुन्हा पाऊस सुरू झाला पण कोणीही जागेवरून हालल नाही आणि नंतर मग सभा एकदाची संपन्न झाली.

 लेट नाईट एडीशन या  ब्लागवरून साभार…. 
         

No comments: