- क्यूं ये नज्म मशहूर हो रही है?क्यूं इंटरनेट पे चक्कर खा रही है?खुशी नहीं है इस बात की; मेरे लिए तो यह बहौत ही दिल दुखाने वाली बात है.अगर आप कहते की, आपकी नज्म तो किसी जमाने की बात करती है, अब वो जमानाही नहीं रहा, आज की तारीख में इस नज्म के कोई मायने ही नहीं है; तो जादा खुशी होती ...बदनसिबी हीच की, तसं झालेलं नाही. 1996 सालची ही कविता, आजच्या काळातल्या भारतातही ती तितकीच ताजी असेल, तर ती लिहिणा:या व्यक्तीला सरहदपार काय यातना होतात, काय सांगू?ब्रिटिश इंडियाच्या काळातल्या भारतात माझा जन्म झाला. मैं पैदाही उस मिट्टी से हुई हूं, ज्या उर्दू भाषेत लिहिते, ती भाषाही तुमच्याच मातीत जन्मली, वाढली. उर्दू साहित्याची कल्पनाही कुणी भारतातल्या उर्दू साहित्याशिवाय करूच शकत नाही. हे सारं सोबत घेऊन मी ‘पाकिस्तानात’ जगले तेव्हा भारताविषयी अप्रूप आणि पोटात माया असणं यात गैर काही नाही, नव्हतंही!आजही माङयावर इथं लोक आक्षेप घेतात, सवाल विचारतात की, भारतात जे चाललंय किंवा चालत होतं, त्याविषयी तू कशाला बोलतेस? लिहितेस? इंडिया की बात में आप क्यूं दखल दे रही है?मी विचारते, का नाही?इकडचे गुंडमवाली तिकडच्यांशी संधान साधून असतात. इकडचे धर्माध आणि तिकडचे धर्माध सारखीच भाषा बोलतात. मग इकडच्या-तिकडच्या लेखकांनी, कलावंतांनी, पत्रकारांनी जर एकमेकांच्या भूमिकेचं समर्थन केलं, मानवी विचार मांडत शांतता आणि सौहार्दासाठी एकमेकांच्या मागे उभं राहिलं तर काय बिघडतं? इथं राहणा:या कुणाही सामान्य पाकिस्तानी माणसाला विचारा, माङयासारख्या लिहित्या माणसांना, शासन आणि धर्माधांविरुद्ध आवाज उठवणा:या व्यक्तींना विचारा, आम्ही सतत उदाहरण देतो भारताचं!इंडिया हमारे लिए एक जिंदा मिसाल है, कम्युनकल हार्मोनी और खुलेपन की!आम्ही नेहमी सांगतो की, बघा जरा, एकाच वेळी स्वतंत्र देश म्हणून आपण प्रवास सुरू केला. भारत कुठं पोहचला, कुठं आहोत आपण? कुठं जातोय? कुठल्या दिशेनं प्रवास करतोय?आपल्या शेजारी जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. मानवी हक्क, नागरी स्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य, मोकळा श्वास घ्यायची आझादी तिथल्या प्रत्येक माणसाला आहे. जगात असा एकमेव देश असावा जिथं अनेक धर्माच्या माणसांची मोठी लोकसंख्या आहे. त्या-त्या धर्मात जाती-पोटजाती आहेत. अनेक वंश-रंग-भाषा घेऊन जगणारी माणसं मोकळेपणानं जगतात, सर्व प्रकारचं स्वातंत्र्य उपभोगतात. दंगली होतात, झाल्या आहेत, पण त्यांचं खुलेआम समर्थन कुणी करत नाही. शरमेची गोष्ट म्हणून या दंगलीकडे पाहिलं जातं, आणि त्या जखमा पोटात घेऊनही हा देश प्रगती करतो आहे. जे भारताला जमतं ते आपल्या देशात का जमू नये?पण माङयासारख्यांचे असे आवाज आमच्या देशात ‘हिंदुस्थानप्रेमी’ म्हणून दडपले तरी गेले आणि व्यक्तिस्वातंत्र्यासह आझाद जगण्याची मागणी करणा:यांची देशनिकाली तरी झाली! देशनिकालीची ही अवस्था मी जगले आहे. माङयाच देशातून हद्दपार होत दोन लहान मुलांना घेऊन दिल्लीतच राहिले होते. पण ‘पाकिस्तानी मुसलमान’ म्हणून मला तिथं कुणी परकेपणाची वागणूक दिली नाही. भारताच्या मातीतच माणसांना सामावून घेण्याचा अद्भुत गुण आहे.आमच्या देशातल्या मातीत जो द्वेष, जो विखार उगवला तो सुदैवानं तुमच्या देशातल्या मातीत रुजला नाही, ही भारताची मोठी ताकद आहे. ही माणूस म्हणून आपली मोठी ताकद आहे असं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे!जरा शेजारी, आमच्या देशात पाहा! अफगाणी धर्माध कडवट विचारांना आमच्या देशाची दारं खुली करून आम्ही इतिहासातीलच नाही, मानवी जगण्यातली सगळ्यात भयानक घोडचूक करून ठेवली! त्यानंतर आमच्या देशातला माहौल ज्या वेगानं बदलला ते महाभयाण आहे. सारा देश कडव्या विचारात वाहवत गेला. तसं बाकी देशांइतकं कडवं जहर आमच्या सिंध प्रांतात कधी नव्हतं. पण आता इथंही तीच कडवी भाषा, तोच विखार बोलला जातोय! ज्या प्रकारची सनातनी विचारसरणी, जी धर्माध लाट देशात आली त्यामुळे मुस्लीम बहुसंख्य देश असूनही कोण सच्च मुसलमान असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.शिया मुस्लीम मुस्लीमच नाहीत असं म्हणण्याइतपत कहर या देशात सर्रास सुरू झाला. शिया मुस्लीम ‘मुस्लीम’ नाहीत अशी कल्पनाही आम्ही कुणी एरवी केली नसती, पण आता त्यांच्या मुस्लीम असण्यावर राजरोस सवाल उपस्थित करून, आम्ही म्हणू तोच मुसलमान असं म्हणण्यार्पयतचं बळ या देशातल्या कडव्या गटांकडे आलं आहे!..जिसे चाहे ये लोग नॉनमुस्लीम करार दे सकते है; सोचीए की क्या ये आप के देश में होना मुमकीन भी है?जो हिंदू है वो हिंदू ही रहेगा ना? उसे जादा या कम हिंदू तो नहीं बना सकते? और बनाके भी क्या बनाओगे?हिंदू म्हणून जगण्याचंही जिथं स्वातंत्र्य आहे, कुणी शैव आहेत, कुणी वैष्णव. त्यांना हिंदू म्हणून एकाच पद्धतीची उपासना करायला भाग पाडली जातेय अशी कल्पना तरी तुमच्या देशात कुणी करू शकतं का?पण आमच्याकडे धर्माचरणाचीही सक्ती आहे. आम्ही म्हणू तोच धर्म, आम्ही म्हणू तोच मुसलमान असा माहौल कडवे धर्माध तयार करताहेत..ये खतरनाक रास्ता है.और आगे जाके जहन्नूम में ही पहुंचाता है.हम उसी ओर जा नहीं रहे, बल्की जहन्नूम में पड चुके है.!मेरी गुजारीश है, आप संभालिए!!तुमच्या देशात तर एकेका धर्माची किती मोठी लोकसंख्या आहे. जर टोकाचं विष रुजलं, फोफावलं तर एकत्र जगणं किती मुश्कील होईल या कल्पनेचंही माङयासारख्या माणसांना इथं राहून भय वाटतं; कारण त्या वाटेवरच्या विखारी जगात जगतोय आम्ही! इथल्या घुसमटीची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.तरीही आम्ही बोलतो आहोत, भांडतो आहोत. लेखक म्हणून इथं बोलण्यालिहिण्यावर किती पाबंदी तरी झगडतो आहोत आणि त्याची भलीभक्कम किंमतही मोजतो आहोत.लेखकानं आपल्या शब्दाची किंमत मोजायचीच असते, त्यात मोठं असं काय आहे? ती किंमत मोजली तरच तुमच्या शब्दाला वजन येतं. तर जनतेला वाटतं की, हा माणूस नुस्ता बोलत नाही, तर व्यक्तिगत जीवनातही त्यासाठी बरंच मोल चुकवतोय!- अवाम आपके लफ्जोंपे तब यकीन करती है, तब साथ चलती है जब आप के काम उन्हे मिसाल लगते है!एक उदाहरण सांगते, आमच्या सिंध प्रांताची अधिकृत भाषा म्हणून सिंधीच्या स्वीकाराला विरोध होता. इस्लामचे दाखले देत देत इतर भाषा आमच्यावर लादल्या जात होत्या. राजकीय इच्छाशक्तीचं समर्थन अर्थातच नव्हतं. त्यावेळी सिंधी साहित्यिक-पत्रकारांनीच एक चळवळ चालवली. मोर्चे काढले, ते दडपले गेले. लेख दडपले गेले. पण लोक ठाम राहिले. त्यांनी सरकारी पुरस्कार नाकारले, परत केले. सगळ्या सरकारी सोयीही नाकारल्या. आणि कुठलंही राजकीय पाठबळ नसताना सिंधी भाषेला अधिकृत भाषेची मान्यता सरकारला द्यावी लागली. कारण सिंधी लोक या सा:या चळवळीच्या, बुद्धिवाद्यांच्या मागे उभे राहिले!बुद्धिवाद्यांच्या भूमिकेला लोकांचा पाठिंबा मिळणं अवघड असतंच, पण का? तर कथनी आणि करणीत अनेकदा लोकांना अंतर दिसतं! ते अंतर दिसलं की लोकही बुद्धिवाद्यांना अंतर देतात. तसं होऊ नये!सध्या मी ऐकतेय की, हिंदुस्थानात लेखक-बुद्धिवादी पुरस्कार परत करताहेत. अभिनंदनीय गोष्ट आहे. काहीतरी भूमिका घेताहेत. सरकारला सांगताहेत की, ज्या पद्धतीचं वातावरण देशात तयार होतंय, ते नाही चालणार!पण पुरस्कार परत करणं केवळ प्रतीकात्मक आहे, हे लक्षात घ्या. ही पहिली पायरी झाली. नुस्ते पुरस्कार परत केले म्हणजे आपण भूमिका घेतली असं होत नाही, त्यापुढे जाऊन पाऊल उचलावं लागेल. शब्दांतूनच नाही, तर तुमच्या वागण्या-बोलण्यातून लोकांना तुमची कळकळ जाणवायला हवी. विखारानं विखाराचं उच्चाटन नाही होत. समंजसपणा आणि शांतता-सौहार्दाची भाषाच या कल्लोळातून बाहेर काढेल! आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तुमच्या शब्दासाठी तुम्ही काय किंमत मोजली, हे लोकांना दिसलं पाहिजे!नाहीतर लेखकांच्या नुस्त्या प्रतीकात्मक कृतीवर लोक तरी का विश्वास ठेवतील?त्यामुळे लेखक-विचारवंतांची जबाबदारी जास्त वाढली आहे. कारण माहौल खराब होतो आहे. लेखक-विचारवंतांचे खून पडताहेत, कुणा लेखकाला कराचीला जाण्याची तिकिटं पाठवली जाताहेत, लिहिण्या-बोलण्यावर पाबंदी येते आहे, हा धोक्याचा इशारा ओळखा!हा असा माहौल घातक आहे.जिसकी शुरुआत आपके मुल्ख में हो रही है, उसका अंजाम हम भुगत रहे है.पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा जिनासाहेबांनी एका सेक्युलर डेमोक्रसीचं स्वपA पाहिलं होतं. त्यांचं ते भाषण फार महत्त्वाचं आहे, सगळ्यांना माहितीही आहे. त्या भाषणात त्यांनी म्हटलं होतं की, देशासाठी सगळे नागरिक एकसमान असतील. जात-धर्म यावरून नागरिकांमधे कुठलाही भेद केला जाणार नाही. ते भाषण आणि ते तत्त्व कित्येक वर्षापूर्वीच आमची सरकारं विसरली.आता अलीकडेच आमच्या सरकारनं पार्लमेण्टमधे ते भाषण सरकारचं अधिकृत धोरण म्हणून स्वीकारलं. इस बात पर अभी भी हमें यकीन नहीं है. हम हैरान हुए है की यह समझदारी सरकार को सुझी कैसे?याचा अर्थ एवढाच की, देश ज्या गर्तेत जाऊन पडलाय त्यातून बाहेर पडायला हवं. यापुढे अधिक नरकयातनात खितपत जगण्यात काही हाशील नाही इतपत समज तरी या देशात जन्माला येते आहे.हिंदुस्थानात तर हा सलोख्याचा, सांझी जिंदगीचा माहौल किती वर्षे जुना आहे. नुस्ती संस्कृती नाही, तर ती ताकद आहे हिंदुस्थानाची! म्हणून हिंदुस्थानाकडे मोठय़ा आशेनं पाहणा:या माङयासारख्यांना वाटतं की, हा सुजाण-सुसंस्कृत-बहुविध जगण्याचा वारसा जपायला हवा.जो जिंदगी सुकून की है. वो और खुशहाल बने!पडोस में रह कर यही मेरी आस है!!कोण आहेत फहमिदा रियाज?या पाकिस्तानातल्या ज्येष्ठ कवी, लेखक आणि कार्यकत्र्या आहेत. त्यांचा जन्म फाळणीपूर्व भारतातल्या उत्तर प्रदेशात मेरठमधे 1946 मधे झाला. त्यांचे वडील शिक्षणतज्ज्ञ होते. सिंध प्रांतातल्या शिक्षणव्यवस्थेसंदर्भात काम करण्यासाठी त्यांचे वडील सिंध प्रांतात गेले आणि मग कुटुंब तिकडेच हैदराबादमधे स्थायिक झाले.त्या जेमतेम चार वर्षाच्या असतानात्यांच्या अब्बूंचे निधन झाले. मात्र आईनं कष्टकरत जिद्दीनं मुलीला शिकवलं. कॉलेजात असल्यापासून फहमिदा कविता करत.त्यानंतर त्यांनी रेडिओ पाकिस्तानवर निवेदिका म्हणूनही काम केलं. पुढे लगA करून त्या काही वर्षे इंग्लंडला गेल्या. तिथंही त्यांनी बीबीसी उर्दूसाठी काम केलं.मात्र पुढे घटस्फोटानंतर त्या कराचीत आल्या. आणि एका जाहिरात एजन्सीबरोबर काम करू लागल्या. डाव्या विचारांचे कार्यकर्ते असलेल्या जफर अली उजन यांच्याशी विवाहानंतर त्या दोघांनी ‘आवाज’ नावाचं मासिक सुरू केलं. मात्र सरकारच्या विरोधात बोलणा:या या मासिकातील त्यांच्या लेखांमुळे त्यांच्यावर अनेक खटले घातले गेले. अनेक दिवस तुरुंगात गेल्यावर त्यांच्या एका चाहत्यानं त्यांना जामीन मिळवून दिला आणि एका मुशाय:याचं आमंत्रण आल्याचा बहाणा करून त्या दोन्ही लहान मुलं आणि बहिणीसह दिल्लीत दाखल झाल्या. त्यांचे पती काही महिन्यांनी भारतात आले. 1981 ते 1987 या काळात सुमारे सहा वर्षे त्या भारतात विजनवासात राहत होत्या. जनरल ङिाया उल हक यांचं सरकार गेलं आणि बेनझीर भुत्ताे सत्तेत आल्या त्यानंतरच त्यांना पाकिस्तानात परतता आलं.आपल्या लेखनस्वातंत्र्यासाठी आणि विचारांसाठी फहमिदा यांनी आपल्या लहानग्या लेकरांसह अनेक वर्षे परवड सहन केली. बेनझीर भुत्ताेंच्या काळात नॅशनल बुक फाउंडेशनच्या त्या महाव्यस्थापक होत्या. काम जोरात सुरू होतं. पण पुढे नवाज शरीफ सरकार आल्यावर त्यांच्यावर भारताच्या एजण्ट असल्याचे आरोप झाले आणि कित्येक दिवस त्या बेरोजगार होत्या. छोटीमोठी कामं करत आपल्या मुलांचा सांभाळ करत त्यांनी रोजीरोटीचा बंदोबस्त केला. अशा अनेक चढउतारांना तोंड देतही फहमिदा आपल्या विचारांना, लेखनस्वातंत्र्याला बांधील राहिल्या. वैयक्तिक आयुष्यात अनेक दु:खं वाटय़ाला आली. वयात आलेला मुलगा पिकनिकला गेलेला असताना पाण्यात बुडून गेला. दुर्दैव छळत होतंच, पण तरीही फहमिदा लढत राहिल्या.ही सध्या गाजत असलेली कविता वरकरणी भारताविषयी आहे असं वाटत असलं, तरी ती आहे पाकिस्तानातल्या धार्मिक उन्मादाविषयी, एकारलेपणाविषयी! धर्म या भावनेनं पछाडलेला देश कसा वागतो, कसं माणसांना बांधतो, आणि अर्धशतकी वाटचालीत माणसांचं जगणं कसं नरक करून टाकतो याचं ते वर्णन आहे.पाकिस्तानात राहून हे सारं इतकं उघड बोलायला-लिहायला हिंमत लागते. ती हिंमत त्यांनी या कवितेतून 1996 मधे केली होती. मार्च 2014 मधे झालेल्या एका मुशाय:यात त्यांनी ही कविता सादर केली, आणि यूटय़ूबच्या माध्यमातून जगासमोर आली!त्यांच्या स्त्रीवादी कविता, बंडखोर लेख, कादंब:या हे सारंच पाकिस्तानात नाही तर जगभर गाजलेलं आहे.आणि आजही त्या परखड बोलण्यासाठी-लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत.तुम बिल्कुल हम जैसे निकले.तुम बिल्कुल हम जैसे निकलेअब तक कहां छुपे थे भाई?वह मूरखता, वह घामड़पनजिसमें हमने सदी गंवाईआखिर पहुंची द्वार तुम्हारेअरे बधाई, बहुत बधाईभूत धरम का नाच रहा हैकायम हिन्दू राज करोगे?सारे उल्टे काज करोगे?अपना चमन नाराज करोगे?तुम भी बैठे करोगे सोचा,पूरी है वैसी तैयारी,कौन है हिन्दू कौन नहीं हैतुम भी करोगे फतवे जारीवहां भी मुश्किल होगा जीनादांतो आ जाएगा पसीनाजैसे-तैसे कटा करेगीवहां भी सबकी सांस घुटेगीमाथे पर सिंदूर की रेखाकुछ भी नहीं पड़ोस से सीखा!क्या हमने दुर्दशा बनायीकुछ भी तुमको नज़र न आयी?भाड़ में जाये शिक्षा-विक्षा,अब जाहिलपन के गुन गाना,आगे गड्ढा है यह मत देखोवापस लाओ गया जमानाहम जिन पर रोया करते थेतुम ने भी वह बात अब की हैबहुत मलाल है हमको, लेकिनहा हा हा हा हो हो ही हीकल दुख से सोचा करती थीसोच के बहुत हँसी आज आयीतुम बिल्कुल हम जैसे निकलेहम दो कौम नहीं थे भाईमश्क करो तुम, आ जाएगाउल्टे पांवों चलते जाना,दूजा ध्यान न मन में आएबस पीछे ही नज़र जमानाएक जाप-सा करते जाओ,बारम्बार यह ही दोहराओकितना वीर महान था भारत!कैसा आलिशान था भारत!फिर तुम लोग पहुंच जाओगेबस परलोक पहुंच जाओगे!हम तो हैं पहले से वहां पर,तुम भी समय निकालते रहना,अब जिस नरक में जाओ, वहां सेचिट्ठी-विट्ठी डालते रहना.........
चार ओळी जीवन....
किये है इतने जहाँ और इक करम कर दे मेरे खुदा तू मेरी ख्वाहिशों को कम करे दे
Total Pageviews
Sunday, November 1, 2015
मेरी गुजारीश है, ..आप संभालिए!!
Friday, October 9, 2015
एव्हरग्रीन रेखा @६१
सौंदर्य आणि कला यांचा अनोखा संगम म्हणजे रेखा! सौंदर्य, अभिनय आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी मजल मारली.
आजही त्या तेवढ्याच सुंदर आणि उत्साही दिसतात. बॉलिवूडमध्ये आपल्या सदाबहार अभिनयाने आतापर्यंत अधिराज्य गाजवत आलेल्या अभिनेत्री रेखा यांचा आज ६१वा वाढदिवस आहे.
- रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन.
- रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन.
Tuesday, September 29, 2015
मुंडे, मोदी, लातूरची सभा आणि पाऊस..एक आठवण .....
स्थळ – क्रीडा-संकुल, लातूर
कार्यक्रम – देशाचे भावी पंतप्रधान आणि आमचे प्राणप्रिय मित्र नमोजी अर्थात नरेंद्र मोदी
प्रमुख व्यक्तिरेखा – नमोजी, गोमूजी अर्थात गोपीनाथ मुंडेजी आणि इतर सहकालाकर
९ एप्रिल चा दिवस माफ करा संध्याकाळ लातूरच्या इतिहासात कायमची लक्षात ठेवावी अशी झाली आहे. भाजपा चे पंतप्रधान पदाचे उमेदवार आणि आमचे प्रियमित्र अर्थात नरेंभाय अर्थात नमोजी यांची सभा लातूरात होणार होती आणि योगायोगाने आम्ही तिथे पोहोचलो. दुपारी ३.३० वाजता सभा होणार म्हणून रखरखत्या उन्हात लोकांनी भली मोठी रांग लातूरच्या क्रीडा-संकुल मैदानाबाहेर लावली होती. तयारी तर जोरदार होती पण नमोजींना येण्यास उशीर होणार होता. मैदान अगदी गच्च भरल होत... अर्थात माणसांनी... आम्हीही एका कोपर्यात उभे राहिलो जिथे मोठा स्पीकर लावला होता.
वाट बघून बघून लोक कंटाळली होती आणि कर्मधर्मसंयोगाने आला... कोण म्हणजे काय साक्षात वरुण राजा पवनदेव आणि विजमातेला घेऊन आला. मग काय सगळीकडे धकधक वाढू लागली आणि भाजपा नेते सर्वांना थोपवून धरू लागले... नमोजी आल्यावर घोषणा कशा द्यायच्या याच मार्गदर्शन केल आणि लगेच त्याची उजळणी करून घेतली.... ‘कौन आया कौन आया’ अशी हाक स्टेज वरुण येताच ‘हिंदुस्तान का शेर आया’ अशी ती घोषणा होती.
जशा जशा पावसाचा कहर वाढत गेला तसा तसा लोकांचा लोंढा जाऊ लागला. काही उत्साही मंडळींनी ज्या चटया बसायला आंथरल्या होत्या त्या लातूरी गुनाप्रमाणे डोक्यावर घेण्यास सुरू केल आणि मेंढ्यांच्या गोष्टीप्रमाणे ही ‘style’ संपूर्ण मैदानात आचरणात येऊ लागली. स्टेज वरील नेत्यांना मग चिंता वाटू लागली की काही क्षणापर्यंत नजर जाईल तिकडे सगळीकडे माणसांची डोकी दिसत होती आणि आता नुसत्या हिरव्या चटया दिसू लागल्या, नमोजी आल्यावर काय दाखवणार असा प्रश्न पडू लागला;नमोजी गोंधळून जातील की आता आपण देशभर जसा देस तसा भेस करतो त्याप्रमाणे येथे डोक्यावर चटया घ्याव्या लागतील की काय. बर आयोजकांना अवघडल्यासारख झालं, लोकांना चटया डोक्यावर घेऊ नका सांगावं तर लोक माइडांनातील निघून जातील. आम्ही मात्र स्पीकर लावला होता त्या आडोशाला उभे राहिलो होतो पण काही क्षणाने आमच्या लक्षात आल की पवनराजाच्या मर्जिणे तो स्पीकर डगमगू लागला होता, निवडणूक ते लढवणार, पंतप्रधान ते होणार पण स्पीकर अंगावर घेऊन आम्ही शहीद होऊन निकाली लागायचो म्हणून आम्हीही चटकन बाजूला मग चटई चाच आधार घेतला.
अशी भयानक परिस्थिति असताना अचानक आमचे अजून एक प्रियमित्र गोमुजी अर्थात गोपीनाथ मुंडेजी मान फिरवत अगदीsuperhero सारखे आले आणि जाणार्या लोकांचा लोंढा परत मैदानात जमा होऊ लागला. गोमुजी भाषण करू लागले आणि एका कार्यकर्त्याने गोमुजींच्या डोक्यावर छत्री धरण्याचा प्रयत्न केला. जनता चटया डोक्यावर घेते आणि नेता छत्री; बर झालं नमोजी अजून आले नव्हते नाहीतर ही सभा लातूरच्या सोडाच पण नमोजींच्या लक्षात आयुष्यभर राहिली असती. पण आमचे प्रियमित्र गोमुजी अतीचलाख आहेत हे उभा महाराष्ट्र आडवा होऊन पहात आलाच आहे, आणि गोमुजी यांनी ती छत्री घेतली आणि ‘माझी जनता जर भिजत असेल तर मीही भिजेण’ अस म्हणून ती छत्री बंद करून ठेऊन दिली आणि मैदानात एकाच जल्लोष सुरू झाला. मग हळूहळू सर्वांनी झेंडे उतरवायला अर्थात डोक्यावरील चटया काढून सुरुवात केली आणि मुंडे साहेब एकदम हीरो झाले... माफ करा... हीरो चेsuperhero झाले.
नंतर मग नमोजी आले. त्यांच्या आणि आयोजकांच्या आणि जनतेच्याही सुदैवाने सारी परिस्थिति नियंत्रणात आली होती. मग‘भाईयो-बहनो’ म्हणत नेहमीचच भाषण झालं. पुन्हा पाऊस सुरू झाला पण कोणीही जागेवरून हालल नाही आणि नंतर मग सभा एकदाची संपन्न झाली.
लेट नाईट एडीशन या ब्लागवरून साभार….
लेट नाईट एडीशन या ब्लागवरून साभार….
लता मंगेशकर : वाढदिवसाच्या शुभेच्छा
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किमान एक पंचमांश लोकांचे जगणे संपन्न करणारा एकच स्वर आहे तो अर्थातच लतादिदींचा.
आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत लतादिदींचा आवाज आपल्याबरोबर असतो.
या आवाजाचे एवढे गारूड की त्याने वयाचे 86 पूर्ण केले आहे .
28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे जन्मलेल्या लता दिदी आज वाढदिवस आहे.
अमृतस्वरांची कोकीळाः लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Monday, January 12, 2015
Tuesday, October 29, 2013
पाणीमहाल
अज दीदन ई चश्म मुहिब्बान रोशन
मीगर्दद व चश्म दुश्मनान गर्दद कूर
(या पाणीमहालाकडे एखाद्या मित्राची नजर गेल्यास त्याचे डोळे प्रसन्नतेने उजळतील, तर शत्रूच्या डोळय़ांपुढे अंधारी येईल!)
सोलापूरहून हैदराबादकडे निघालो, की वाटेत नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) नावाचे पहिलेच मोठे गाव लागते. खरेतर हे गाव येण्यापूर्वी या गावाशेजारचा किल्लाच लक्ष वेधून घेतो. या नळदुर्ग किल्ल्यात असलेल्या पाणीमहाल नामक एका गूढ-अद्भुत वास्तूवरील हा फारसी लिपीतील शिलालेख व त्याचा हा अर्थ!
मराठवाडय़ात जोरदार पावसाच्या बातम्या आल्या, की हा नळदुर्ग एकदम चर्चेत येतो. एरव्ही कोरडी ठणठणीत असणारी इथली बोरी नदी दुथडी भरून वाहू लागते. हे पाणी किल्ल्यातून वाहणाऱ्या नदीवरील पाणीमहालाला येऊन धडकते. बांध भरतो आणि त्याच्या नर-मादी सांडव्यावरून तो वाहू लागतो. धावते पाणी आणि त्याला आवर घालणारी एक चिरेबंदी वास्तू यांच्या भेटीतून सौंदर्याचा आविष्कार जन्म घेतो. ज्यामुळे हा पाणीमहालच नाही तर सारा नळदुर्गच खुलून जातो. यंदा तब्बल सहा वर्षांनंतर हा आविष्कार पुन्हा अवतरल्याने अनेकांची पावले नळदुर्गकडे धावली आहेत.
हा किल्ला व्यवस्थित पाहायचा असेल तर सोलापूर किंवा तुळजापूरला मुक्काम करत भल्या सकाळीच नळदुर्गच्या दारात हजर व्हावे. नळदुर्ग गावात आल्यासरशीच ही अवाढव्य वास्तू समोर उभी राहते. १२६ एकर क्षेत्रफळ आणि त्याला तब्बल ११४ बुरुजांची दुहेरी तटबंदी, ही आकडेवारीच या किल्ल्याची भव्यता स्पष्ट करते.
नळदुर्ग ही चालुक्यांची निर्मिती! पण स्थानिक लोक त्याचा इतिहास अगदी पुराणातील राजा नल आणि दमयंतीपर्यंत नेऊन भिडवतात. चालुक्यांनंतर इथे बहमनी राजवट आली. या बहमनी राजवटीचे तुकडे झाल्यावर पुढे तो विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. या राजवटीतच सुलतान अबुल मुजफ्फर अली आदिलशाह पहिला याने इसवी सन १५६० मध्ये गडाला आजचे हे आक्रमक रूप दिले. अशारीतीने चालुक्य, बहमनी, आदिलशाही, मुघल आणि सरतेशेवटी हैदराबादचा निजाम असा भलामोठा प्रवास करत हा नळदुर्ग आज एक राष्ट्रीय स्मारक बनला आहे.
तब्बल हजारएक वर्षे जुनी ही काळाची पावले शोधतच आपण नळदुर्ग फिरू लागतो. गड विस्ताराने भलामोठा आणि त्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंचीही तेवढीच गर्दी. हत्तीखाना, मुन्सिफ कोर्ट, जामे मशीद, धान्य - दारूगोळय़ांची कोठारे, ब्रिटिशांची स्मारके, मछली बांध, नऊ पाकळय़ांचा नवबुरूज, रंगमहाल, बारादरी, राजवाडा, राणीमहाल, उफळय़ा ऊर्फ टेहळणीचा बुरूज असे गडावर बरेच पाहण्यासारखे आहे. पण या साऱ्यांत पाणीमहाल नळदुर्गच्या हृदयस्थानी!
वास्तूंच्या या गोतावळय़ातच राजवाडय़ाच्या दिंडीदरवाजातून त्या पाणीमहालाचे प्रथम, भिजरे दर्शन घडते आणि मग आपले मनही चिंब होते.
गडाच्या मध्यातून वाहणारा नदीचा तो फाटा. पाण्याने भरलेला! भूगोलातील या आश्चर्याला इतिहासातील तटबुरुजांच्या बाजूबंदांनी सजवलेले ..आणि या साऱ्या देखाव्यात नदीपात्रात मधोमध पाय रोवून उभा ठाकलेला तो पाणीमहाल! सशक्त शरीराचा आणि नाजूक सज्जे, कमानी-गवाक्षांचा! या गवाक्षांच्याच पुढून ते नर-मादी धबधबे कोसळत असतात. हिरवाईच्या कोंदणात, पाण्याचे सान्निध्य घेत!
हा सारा एका नदीवरचा-तिच्या पाण्यावरचा खेळ! तो सुरू आहे, एका चिरेबंदी तरल वास्तूशी! नळदुर्गच्या उत्तरेकडून बोरी नावाची एक नदी वाहात येते. ती उत्तर आणि पूर्व बाजूने गडाला वेढा घालत दक्षिणेकडे निघून जाते. ..हा इथला मूळचा भूगोल! पण या भूगोलालाच मग कधीकाळी एका पराक्रमी इतिहासाची जोड मिळाली. नळदुर्गच्या निर्मात्याने या नदीच्या आरंभीच तिला तिच्या आकाराचे आणखी दोन फाटे दिले-तयार केले. एक फिरवला गडाच्या पश्चिमेकडून दक्षिण दिशेला, तर दुसरा गडाच्या मध्यभागातून पुन्हा मूळ नदीकडे वळवला. मूळ नदी आणि तिच्या नव्याने फिरवलेल्या या फाटय़ांमुळे या भुईकोटाचा एक जलदुर्गच बनला. दुर्गाभोवती फिरलेल्या नदीच्या या पाण्याने या दुहेरी तटाच्या किल्ल्याभोवती जणू पाण्याचा आणखी एक तट उभा राहिला. तर गडाच्या मधून फिरलेल्या पात्रातून पाण्याची सोय भागवली गेली.
नळदुर्गच्या या नदीजोड प्रकल्पास दुसरा इब्राहिम आदिलशाह याने इसवी सन १६१३ मध्ये, म्हणजे बरोबर चारशे वर्षांपूर्वी आणखी एक प्रकरण जोडले. जोडले कसले, ऐन नदीपात्रात उभे केले. गडाच्या मधोमध वाहणाऱ्या या नदीप्रवाहावर त्याने एक भलामोठा बांध घातला. ज्यायोगे नदीपात्रामुळे विभक्त झालेला किल्ला तर पुन्हा जोडला गेलाच, पण त्यापेक्षाही या बांधाच्या पोटात एक महाल तयार करत या स्थापत्याला सौंदर्याचीही जोड दिली. स्थापत्य आणि पाण्याच्या सुंदर मिलाफातून तयार झालेला हाच तो पाणीमहाल!
नदीपात्रात उभी असलेली ही गूढ चिरेबंदी वास्तू एरवीदेखील येणाऱ्या प्रत्येकाला खुणावते, पण त्यातही पावसाळा सुरू झाला, की या महालाचे सूर बदलतात.
पाऊस सुरू होतो. गडाच्या दिशेने येणाऱ्या बोरीतून तो वाहू लागतो. पात्र फुगत जाते आणि हळूहळू बांध भरू लागतो. मग एके दिवशी अचानक हे पाणी या महालावर प्रेम करत त्याच्या अंगाखांद्यावरून वाहू लागते.
पाण्याचा हा भलामोठा पसारा महालावरील नर-मादी या दोन सांडव्यावरून विलक्षण वेगाने फुसांडत बाहेर पडतो. कुणी म्हणते नळदुर्गचे धबधबे वाहू लागले, कुणी पाणीमहाल जिवंत झाल्याची उपमा देते, कुणी नर-मादी जागे झाल्याचे बोलते, तर कुणी आणखी काही! त्या दोन धारा जिवंत होतात आणि जणू या चिरेबंदी वास्तूच्या अंगावरूनच चैतन्याचे झरे वाहू लागतात. केवळ पाण्याच्या त्या एका स्पर्शाने इतके दिवस शांत, मूक असलेल्या वास्तूचे सारे सौंदर्य उमलून येते.
खरेतर ही वास्तूही या पाण्याची-पावसाची दरवर्षी अतिशय आतुरतेने वाट पाहात असते. पण मराठवाडय़ाशी कायम अंतर ठेवणारा हा पाऊस या नळदुर्गपासूनही चार हात दूर राहतो. वर्षांमागे वर्ष जातात, ऋतू-नक्षत्रांची अनेक आवर्तने सरतात, पण बोरी कोरडीच राहते आणि मग पाणीमहालही असाच अश्रू आटलेला उरतो.
पण, मध्येच कधीतरी एखाद्या वर्षी तो बरसू लागतो. पाऊस पडतो. बोरी दुथडी भरून वाहू लागते. मग गेल्या अनेक वर्षांचे हे आर्त दूर लोटत ही वास्तू पुन्हा मोहरते.. यंदाची ही तृप्तता अशीच काहीशी!
काय आणि कशी आहे, ही गूढरम्य वास्तू! १७४ मीटर लांब, अडीच ते १४ मीटर रुंद आणि तब्बल पाचमजली इमारतीएवढी म्हणजे १९ मीटर उंच! या बांधावरूनच चार मार्ग महालाच्या पोटात उतरतात. पहिला साधारण दोन मजले खाली उतरतो. इथे एक अष्टकोनी हौद, ज्यात कधीकाळी पाणचक्की चालत होती. पाण्याच्या शक्तीचा हा आणखी एक पैलू! साठलेले पाणी गतीने बाहेर पडत असतानाच त्यावर धान्याची चक्की चालविण्याची ही योजना. वेगवेगळय़ा मोऱ्यांमधून वेगाने येणारे हे पाणी इतिहासात इथे या चक्कीला फिरवायचे आणि त्यावर साऱ्या सैन्यासाठीचे धान्य दळून निघायचे. वरवर वाटणाऱ्या सौंदर्याला आता विचार-हुशारीची किनारही जाणवू लागते.
दुसरा भुयारी मार्ग पाणीमहालाच्या छतावर उतरतो, तर चौथा एकाखाली एक तीन मजल्यांवरून गणेशाचे दर्शन घडवतो. अन्य ठिकाणच्या कुठल्या तरी मंदिराची गणेशपट्टी इथे या दालनात दर्शनी भागात बसवलेली आहे. या गणेशाच्याच वास्तव्याने मग या महालालाच त्याचे नाव पडले. ही वास्तू इस्लामी कलेतील, पण त्यातही हे 'मांगल्य' कसे सामावलेले!
या साऱ्यातील तिसरी भुयारी वाट महत्त्वाची. ही त्या पाणीमहालाकडे निघते. अरुंद जिना त्या बांधकामाच्या आत शिरतो. ही वाट त्या बांधाच्या अगदी तळापर्यंत उतरते. या वाटेच्या मध्यावर तो पाणीमहाल दडला आहे.
पायऱ्या उतरू लागतो तसे अंधार आणि गूढ भीतीचे सावट चेहऱ्यावर दाटू लागते. समोरून अचानक वर उसळणारी वटवाघळे या भीतीत भर घालत असतात. मनातली ही भीती-ताण आणि पाठीमागचा विशाल जलाशय याचे दडपण झेलत आपण त्या वाटेच्या मध्यावर येतो आणि एकदम प्रकाशाची चाहूल लागते. हायसे वाटते. अंधारात बुडाल्याशिवाय प्रकाशाचे हे द्रष्टेपण समजत नाही, असेच काहीसे. प्रकाशाचे हे बोट पकडत डावीकडे वळत, चारदोन पावले टाकली, की एका सुंदर दालनात आपले पाऊल पडते. हाच तो एवढा वेळ प्रतीक्षा पाहणारा पाणीमहाल!
पश्चिम-उत्तरेकडे तोंड केलेली आयताकृती अशी ही दोन दालने, तर त्याला लागूनच बाहेर डोकावणारा नऊ गवाक्षांचा एक रेखीव सज्जा! यातील मुख्य दालनाच्या मधोमध कारंजे. या दालनाला लागूनच डावीकडे एक विशेष खोली अगदी स्नानगृह आणि शौचकूपासह! साऱ्या वास्तूत महिरपी भिंती, कलात्मक कमानी. छत-भिंती-कमानींवर सर्वत्र चुन्याच्या गिलाव्यात केलेले बारीक नक्षीकाम, छताच्या मधोमध झुंबर-हंडय़ांसाठीच्या कडय़ा, वेलबुट्टीत सजलेले सज्जाचे नऊ गवाक्ष! आजही सारे कसे नीटस, अलगद! अगदी काल-परवापर्यंत वापरात असल्याप्रमाणे!
हे सारे पाहता-पाहता भारावून जायला होते. या अवस्थेतून बाहेर सज्ज्यात यावे तो आपले जणू अस्तित्वच हरवायला होते. काय म्हणावे या दृश्याला, कसे प्यावे या सौंदर्याला. त्या रेखीव गवाक्षांच्या कमानींचे कोंदण घेत वरून कोसळणाऱ्या पाण्याचे पडदे अखंड वाहात असतात. मागे सारा हिरवाईचा काठ आणि त्यावरचे हे शुभ्र ईश्वरी देणे..जणू सारे जीवनच भारून जाते!
पावसाळा नसेल त्या वेळी या गवाक्षातून संध्याकाळच्या त्या पश्चिमा रंगतात. रात्रीचे आकाश चमचमते आणि पौर्णिमेचा चंद्रही आत डोकावतो.
..कसे असेल ते दृश्य! बाहेर सज्ज्यातून कोसळणारे पाण्याचे पदर, त्यातून आत शिरणारा मंद, गार वारा, कधी आत उतरणारे ते मावळतीचे गहिरे रंग तर कधी रात्रीचे चांदणे! कोनाडय़ातील दिवे, हंडय़ांतून पाझरणारा तो मंद प्रकाश, महालाच्या मधोमध नाचणारे ते कारंजे, त्याभोवतीने नृत्य करणारी ती ललना आणि शेजारच्या दालनातून आळवले जाणारे सूर-संगीत..हे सारे सौंदर्याचे राग, रंग, छटा अनुभवताना त्या वास्तूच्या, त्या वास्तुपुरुषाच्या मनात नेमके कुठले भाव उमटत असतील. सगळे अनाकलनीय, स्वर्गीय!
या अज्ञात स्थपतीचा मनोमन हेवा वाटतो, त्याच्या रसिकतेचे कौतुक वाटते आणि सौंदर्यदृष्टीची भुरळ पडते. या अनाघ्रात सौंदर्याला किती काळ पाहावे आणि किती साठवावे, असे होते.
असे वाटते, कधीकाळच्या या विलासी रंगात आज एकदम हे समाधीचे भाव कुठून आले?
Wednesday, February 27, 2013
सर्वाना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो .या
दिवशी पासून आपण एक संकल्प करू कि मराठी भाषा आणि मराठी माणूस हा जगात
आपली कीर्ती गाजवेल आणि या साठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू. ....आपली
मराठी भाषा हि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असावी हि इच्छा
प्रत्येकाने मनात बाळगून आपली मराठीचा झेंडा अटकेपार जावा यासाठी प्रयत्न
करायला हवेत. तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी आहोत असा म्हणता येईल.!!!
Subscribe to:
Posts (Atom)