टीव्हीच्या अतिरेकामुळे लहान मुलांच्या मनावर आणि
शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांची कितीही चर्चा होत असली तरी टीव्हीवेड
काही कमी होताना दिसत नाही. गेल्याच आठवडय़ात हार्वर्ड विद्यापीठाच्या
अभ्यासकांनी काढलेल्या निष्कर्षांत दररोज दोन तासांहून अधिक काळ टीव्ही बघत
राहिल्याने मधुमेह आणि हृदयविकार निर्माण होतात.
अमेरिकन ‘अॅकेडमी ऑफ पेडिअॅट्रिक्स काऊन्सिल’ने
नव्या अहवालाद्वारे टीव्ही केवळ शारीरिक हालचालीच कमी करीत नाही, तर
खाद्यपदार्थाच्या जाहिराती मुलांच्या खाण्याच्या सवयी बिघडवू शकतात, असा
इशारा दिला आहे.लहान मुलांमधील स्थूलत्त्व, ड्रग्ज, िहसक, गुन्हेगारी वृत्ती, अभ्यासातील
पीछेहाट या सर्वाना टीव्ही जबाबदार असल्याचे ‘अॅकेडमी ऑफ पेडिअॅट्रिक्स
काऊन्सिल’ने अहवालात म्हटले आहे. अमेरिकी व्यक्ती साधारण पाच तास टीव्ही
पाहते. मात्र जगभरातील लहान मुले मोठय़ा माणसांहून दोन तास अधिक टीव्ही
पाहातात, असे समोर आले आहे.