चार ओळी जीवन....
किये है इतने जहाँ और इक करम कर दे मेरे खुदा तू मेरी ख्वाहिशों को कम करे दे
Total Pageviews
Monday, April 30, 2007
आकाश...
आकाश पेलायचं म्हणताना,
हे कधी कळलच नाही..
डोळ्यापुढे ते ओळखीचं आभाळ,
आता उरलच नाही...
देऊळ.....
कुठे राधा, कुठे मोहन,
कुठे ते
गोकुळ
आहे..
मिलनाच्या संकेतस्थळी,
उध्वस्त फ़क्त
देऊळ
आहे...
स्वप्नात माझ्या....
पुन्हा माझ्या स्वप्नात कुणी
हळुच गेले डोकावून....
हा दोष गतकाळाचा म्हणु की,
स्वप्नेच गेली सोकावुन..
Wednesday, April 4, 2007
देव...
माझ्याइतकाच 'तो' तुमच्यातही वसत असतो.
'देव' असला तरी माणसाकडुन फ़सत असतो....
पोरवय......
माणसे तेव्हा मला देवासारखी वाटायची.....
पोरवयातली गोष्ट आहे तेव्हा आजी पोथी वाचायची.....
Wednesday, March 28, 2007
मीत्र.....
चढुन जाईन मी म्हणालो,जीवनाचा हा पर्वत महाकाय !
शत्रुइतकेच मित्रानिही ओढले पण माझे पाय !
Tuesday, March 27, 2007
गुलाबाच्या देशा....
गुलाबाचा देश.........
जिथे भेट्लो पहिल्यादा तो गुलाबाचा देश होता.
कि काट्यानिही घेतला फ़ुलाचा वेश होता.......
Friday, March 16, 2007
चारोळी .......
Newer Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)